संकल्पपूर्ती
संकल्पपूर्तीचा क्षण भाग्याचा
दीपक तेवावा सदा सौख्याचा
परस्परांची नित्य मने मिळू दे
प्रीत बहरू दे, शांती लाभू दे
... ||१||
तीर्थक्षेत्र जणु घरच तुमचे
वरद विनायक अपत्य तुमचे
रहावी तुम्हावरी कृपा रेणुकेची
ददात न पडो कधी कशाची ... ||२||
- हरीश कुलकर्णी
२५.९.२०२५
No comments:
Post a Comment