Search This Blog

About Me

My photo
जिंदगी गुजर गई सबको खुश करनेमें ... जो खुश हुए वो अपने नहीं थे ... जो अपने थे वो कभी खुश नहीं हुए ...

Friday, January 09, 2015

प्रवास

कायद्याचा कीस काढूनही
न्याय कुठं दिसलाच नाही
अनेक गणितं करुनही
शून्याची किंमत कळलीच नाही    ....१

वैद्यक सारं शिकूनही
प्राणाचं मर्म उमगलंच नाही
वसंतातच फुलांचा बहर
सरला कसा कळलं नाही         ....२

सप्तस्वरांची करूनी आराधना
जीवनाचा सूर गवसलाच नाही
भूगोल सारा फिरूनही 
माझं स्थान  समाजलचं नाही     ....३

इथे तिथे लाभली सोबत
खरी की खोटी कळलीच नाही
प्रवास इतका करुनही
थांबायचं कुठं कळलंच नाही       ....४


- हरीश कुलकर्णी