कायद्याचा कीस काढूनही
न्याय कुठं दिसलाच नाही
अनेक गणितं करुनही
शून्याची किंमत कळलीच नाही ....१
वैद्यक सारं शिकूनही
प्राणाचं मर्म उमगलंच नाही
वसंतातच फुलांचा बहर
सरला कसा कळलं नाही ....२
सप्तस्वरांची करूनी आराधना
जीवनाचा सूर गवसलाच नाही
भूगोल सारा फिरूनही
माझं स्थान
समाजलचं नाही ....३
इथे तिथे लाभली सोबत
खरी की खोटी कळलीच नाही
प्रवास इतका करुनही
थांबायचं कुठं कळलंच नाही ....४
- हरीश कुलकर्णी
- हरीश कुलकर्णी
No comments:
Post a Comment