समजायला लागलयं
आयुष्यातल्या प्रत्येक टप्प्यावर जे जे मला दुखवत गेले त्या त्या सगळ्यांना न दुखावता सोडून देणं आताशा मला जमायला लागलयं.......
संघर्षाच्या किंवा वादविवादाच्या क्षणी वाद न घालता तेथून दूर निघून जाण्यातच खरी परिपक्वता असते.
माझ्या बरोबर घडणाऱ्या अनेक वाईट गोष्टींचा उहापोह करून त्यात शक्ती खर्ची घालून आजूबाजूला जे जे उत्तम आहे त्याकडे बघण्याचा दृष्टिकोनच बदलून जातोय हे जाणवायला लागलयं....
आलेल्या अनुभवांतून बाहेर पडत स्वतःला सावरून, शिकून मोठं होणं जमायला लागलय.... कोणत्याही न पटणाऱ्या गोष्टींवर काहीही न बोलणे म्हणजे त्यांना संमती असणे गरजेचे नाही .कधी-कधी काहीही न बोलणं किंवा कोणतही प्रत्युत्तर न देणं...खूप काही बोलून जाते.
आपण लोकांवर किंवा त्यांच्या विचारांवर बंधन आणू शकत नाही पण आपण स्वतःच्या मनावर मात्र बांध घालू शकतो. आपण अशा लोकांच्या वागण्याला किती मनावर घ्यायचे, त्यांना किती महत्त्व द्यायचं, त्यांनी बोललेल्या वाईट साईट गोष्टी किती डोक्यात साठवून ठेवायच्या आणि स्वतःचे आयुष्य खराब करून घ्यायचं हे ठरवणं गरजेचं असतं. बऱ्याचदा असे वागणारे किंवा बोलणारे लोक दुसऱ्याबद्दल वाईट बोलताना स्वतःचा हीन दर्जा ही दाखवून देत असतात. अशा लोकांच्या आधारहीन शब्दांची आताशा मन मजा घ्यायला लागलंय........
कधीकधी परिस्थितीला आहे तसंच सोडून देणं आणि शांत राहणं सोईचं ठरतं. लोकांना कुठल्याही गोष्टींचं स्पष्टीकरण देत बसणं आणि त्यांनी तुम्हाला समजून घेण्याची अपेक्षा करणं बावळटपणाचं आहे हे कळल्यावर मी आताशा मला त्या द्रुष्टीनं घडवायला लागलोयं.....
मी इतके दिवस ज्याचा प्रकर्षांने शोध घेत होतो ती मनःशांती, समाधान मला मिळालं जेव्हा ठरवलं की मी अशा लोकांपासून लांब राहावे, जे मला चांगलं म्हणत नाहीत. कारण त्यांच्या दृष्टीने मी जर चांगला नाही तर मी स्वतःला त्यांच्या साच्यात बसवणे योग्य नाही. कुठलेही वादविवाद किंवा भावना नसलेले संबंध मला नको आहेत. समोर दुसऱ्याला चांगलं म्हणून मागे वाईट वागणार, बोलणार् या वरवर संबंध ठेवणार्या लोकांना आता मी कटाक्षाने दूर ठेवायला हवं हे पटायला लागलंय....
माझ्या स्वतः च्या आनंदाचा ठेवा मला सापडलायं आणि उशीरा का होईना पण मी आताशा त्या वाटेवर समाधानानं पावलं टाकायला लागलोयं.......
आताशा मला समजायला लागलयं हळूहळू.....
-----
मरावे कसे
खांदेकरी शिव्या देणार नाहीत तिरडी उचलताना,
इतपत वजन मर्यादित ठेवावे.
सरणावर ठेवताच जळायला मदत व्हावी,
म्हणून थोडी चरबीही असायला हरकत नाही अंगात.
पूर्णपणे जळून झाल्यावर उरणारी दोन -अडीच किलो वजनाची
हाडे,
काही काळाने पंचमहाभूतांत विलीन होऊन जाणार आहेत,
त्यामुळे मेल्यावर आपले काही मागे राहील,
या भ्रमात राहण्याचा मूर्खपणा करू नये .
दफन झाले तर कीड्यामुंग्यांना मेजवानी आणि
झाडांना दर्जेदार खत मिळणार आहे,
शिवाय शरीरातला काही भाग,
सल्फर आणि कार्बनच्या स्वरूपात,
पंचमहाभूतात विलीन होणार आहे,
ही माहितीसुद्धा हाताशी असू द्यावी.
बँकेत एवढाच बॅलन्स असू द्यावा,
ज्यामुळे वारसांमध्ये भांडणे लागणार नाहीत,
मुले एकमेकांच्या जीवावर उठणार नाहीत,
सेवाभावी संस्था मागे लागणार नाहीत,
८० - जी चे प्रमाणपत्र घेऊन !
आणि असलीच थोडी प्रॉपर्टी तर,
मृत्युपत्र करताना मुलाच्या नावे करण्याऐवजी,
नातवाच्या नावे करावी,
म्हणजे नातू सज्ञान होईपर्यंत,
आपला नालायक मुलगा आपल्याला शिव्या देत,
शेवटच्या क्षणी पाणी पाजल्याचा पश्चात्ताप करीत,
रोज आपली आठवण काढत राहील.
स्वत:च्या अंत्ययात्रेच्या वेळी बऱ्या - वाईट आठवणींच्या
क्षणांची नोंदवही
जाता जाता हळूच,
परमेश्वराच्या रद्दीच्या दुकानात टाकून पुढे सटकावे.
जन्माला का आलो आणि का मेलो,
यासारखे प्रश्न 'राम बोलो' च्या डस्टरने पुसून टाकावे
मनाच्या पाटीवरून.
गल्लोगल्ली श्रद्धांजलीचे फलक लावण्यासाठी
आणि वृत्तपत्रात जाहिराती देण्यासाठी मित्रांना भुर्दंड
पडेल,
इतकी कीर्ती मिळवू नये.
पुतळ्याचेही स्वप्न बाळगू नये.
कारण कार्यकर्ते करतील त्याही निधीत भ्रष्टाचार
आणि कावळ्यांना मिळेल सार्वजनिक कमोड !
मरताना डोळे मिटलेले असावे,
स्वतःच्या निधनाच्या चुकीच्या बातम्या वाचायला मिळू नयेत,
म्हणून आणि तोंड उघडे असू द्यावे
सांगायचे बरेच काही राहून गेले पण
ऐकून घेण्यासाठी कुणाकडेच वेळ नव्हता म्हणून.
महागुंगीच्या धुक्यात शिरताना,
समोर तो स्टेशनमास्तर भेटावा,
त्याच्याकडे चौकशी करावी
'पुष्पक विमान' कोणत्या प्लॅटफॉर्मला लागते याची
आणि वैकुंठाचे तिकीट काढून
वाट पाहत बसावे तुकारामाचे गाणे म्हणतः
आम्ही जातो अमुच्या गावा, अमुचा राम राम घ्यावा !
-----
शब्द का प्रयोग
18 दिन के युद्ध ने,
द्रोपदी की उम्र को
80 वर्ष जैसा कर दिया था...
शारीरिक रूप से भी
और मानसिक रूप से भी
शहर में चारों तरफ़
विधवाओं का बाहुल्य था..
पुरुष इक्का-दुक्का ही दिखाई पड़ता था ।
अनाथ बच्चे घूमते दिखाई पड़ते थे और उन सबकी वह महारानी
द्रौपदी हस्तिनापुर के महल में
निश्चेष्ट बैठी हुई शून्य को निहार रही थी ।
तभी,
श्रीकृष्ण
कक्ष में दाखिल होते हैं
द्रौपदी
कृष्ण को देखते ही
दौड़कर उनसे लिपट जाती है ...
कृष्ण उसके सिर को सहलाते रहते हैं और रोने देते हैं
थोड़ी देर में,
उसे खुद से अलग करके
समीप के पलंग पर बैठा देते हैं ।
द्रोपदी : यह क्या हो गया सखा ??
ऐसा तो मैंने नहीं सोचा था ।
कृष्ण : नियति बहुत क्रूर होती है पांचाली..
वह हमारे सोचने के अनुरूप नहीं चलती !
वह हमारे कर्मों को
परिणामों में बदल देती है..
तुम प्रतिशोध लेना चाहती थी और, तुम सफल हुई, द्रौपदी !
तुम्हारा प्रतिशोध पूरा हुआ... सिर्फ दुर्योधन और दु:शासन ही
नहीं,
सारे कौरव समाप्त हो गए
तुम्हें तो प्रसन्न होना चाहिए !
द्रोपदी: सखा,
तुम मेरे घावों को सहलाने आए हो या उन पर नमक छिड़कने के
लिए ?
कृष्ण : नहीं द्रौपदी,
मैं तो तुम्हें वास्तविकता से अवगत कराने के लिए आया हूँ
हमारे कर्मों के परिणाम को
हम
दूर तक नहीं देख पाते हैं और जब वे समक्ष होते हैं..
तो, हमारे हाथ में कुछ नहीं रहता।
द्रोपदी : तो क्या,
इस युद्ध के लिए पूर्ण रूप से मैं ही उत्तरदायी हूँ
कृष्ण ?
कृष्ण : नहीं, द्रौपदी
तुम स्वयं को इतना महत्वपूर्ण मत समझो...
लेकिन,
तुम अपने कर्मों में थोड़ी सी दूरदर्शिता रखती तो, स्वयं
इतना कष्ट कभी नहीं पाती।
द्रोपदी : मैं क्या कर सकती थी कृष्ण ?
तुम बहुत कुछ कर सकती थी
कृष्ण : जब तुम्हारा स्वयंवर हुआ...
तब तुम कर्ण को अपमानित नहीं करती और उसे प्रतियोगिता
में भाग लेने का एक अवसर देती
तो, शायद परिणाम
कुछ और होते !
इसके बाद जब कुंती ने तुम्हें पाँच पतियों की पत्नी बनने
का आदेश दिया...
तब तुम उसे स्वीकार नहीं करती तो भी, परिणाम
कुछ और होते ।
और
उसके बाद
तुमने अपने महल में दुर्योधन को अपमानित किया...
कि अंधों के पुत्र अंधे होते हैं।
वह नहीं कहती तो, तुम्हारा चीर हरण नहीं होता...
तब भी शायद, परिस्थितियाँ कुछ और होती ।
हमारे शब्द भी
हमारे कर्म होते हैं द्रोपदी...
और, हमें
अपने हर शब्द को बोलने से पहले तोलना बहुत ज़रूरी होता
है...
अन्यथा,
उसके दुष्परिणाम सिर्फ़ स्वयं को ही नहीं... अपने पूरे
परिवेश को दुखी करते रहते हैं ।
संसार में केवल मनुष्य ही एकमात्र ऐसा प्राणी है...
जिसका
"ज़हर"
उसके
"दाँतों" में नहीं,
"शब्दों " में है...
इसलिए शब्दों का प्रयोग सोच समझकर करें।
ऐसे शब्द का प्रयोग कीजिये जिससे,
किसी की भावना को ठेस ना पहुँचे।
क्योंकी महाभारत हमारे अंदर ही छीपा हुआ है ।
-----
एक अनामिक हुरहुर
कोणालाच जीवनाच्या
कोणत्या वळणावर आपली कोणाशी गाठभेट होणार आहे याची पूर्वकल्पना नसते. प्रत्येकाशी
आपलं रक्ताचं नातं असू शकत नाही म्हणून ईश्वरी कृपेने काही माणसं अद्भुतरित्या
आपल्या जवळ येतात जसं की नदीच्या प्रवाहात वाहताना दोन ओंडके अचानक एकत्र येतात.
सोबत कुठपर्यंत असेल ते काहीच निश्चित नाही पण काही काळ एकत्र प्रवास होऊन पुढे
वेळ आल्यावर विलग होतात... एक अनामिक हुरहुर मागे ठेऊन ! अशी नाती खरंच अद्भुत
असतात !!!
-----
प्रत्येक व्यक्तीला महत्व असतं
पंगतीत मीठ
वाढणारा परत येत नाही तसच काही माणसं देखील आयुष्यातून एकदा निघून गेले की परत येत
नाहीत. बहुदा ते गेल्यावरच त्यांची किंमत कळते.
का घडतं असं?
मिठाचं महत्व जेव्हा पानात असतं तेव्हा कळतच नाही. कारण
त्यावेळी माणसाचं लक्ष पानात येणाऱ्या गोड पदार्थावर असतं. तो पदार्थ कुठला, कसा, त्याची
चव कशी, तो चांगल्या तुपापासून बनवलाय का? ते खाऊन आपल्याला काही त्रास होऊ शकतो का? हे
काहीच माहीत नसतं तरी देखील तो गोड पदार्थ हवासा असतो. कारण मोह. असं म्हणतात की
संकट हे नेहमी सुंदर रूप घेऊनच येतं.
त्या गोड पदार्थाच्या मोहापायी ताटातल्या मिठाकडे जराही
लक्ष जात नाही. कारण आपण त्याला कुठेतरी गृहीत धरायला लागतो. त्याचा खारटपणा नकोसा वाटतो. ते आपल्या पानातील
इतर पदार्थात मिक्स होऊ नये म्हणून आपणच त्याला स्वतःहून बाजूला करतो. त्यात कधी वाटीतील रस्सा भाजी वगैरे सांडली तर
ते पानात असून देखील उपयोग नसतो.
नको वाटतात ना आपल्या आयुष्यात अशी मिठासारखी माणसं? कारण ती
तुमच्या चांगल्यासाठी सल्ला देतात, कधी हक्काने कान धरतात तर कधी पोटतिडकीने समजावून सांगतात. नकोच वाटतात,
कारण त्यावेळी गोड पदार्थाची झिंग चढलेली असते. त्याशिवाय पानातील इतर पदार्थ दिसत नाही तर
वाटीमागे असलेलं ते एवुढंस मीठ काय दिसणार ना? पण जेव्हा तोच गोड पदार्थ खाऊन तड
लागते ना तेव्हा पाण्याच्या ग्लास मध्ये लिंबाची फोड पिळली जाते आणि हात आपसूक मीठ
शोधायला लागतो. कारण त्याशिवाय खाल्लेलं अन्न पचणार कसं?
म्हणून देवाने वाढलेल्या ह्या आयुष्यरूपी पानात प्रत्येक
व्यक्तीला महत्व असतं आणि ते द्यावं.
आपल्याला ती व्यक्ती आवडो की न आवडो ती आयुष्यात आलीय ना म्हणजे नक्कीच
मागील जन्माचा संबंध असतो आणि मिठासारखी माणसं तर नक्कीच ओळखावी भलेही ती तुमच्या
आयुष्यात फार महत्वाचे नसतीलही पण निदान वाईट तर करणार नाहीत ना? ...
-----